जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान डेकाटे, रावी पाटणी यांना तिहेरी मुकुट

Foto
: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हा मानांकन टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान बायजीपुरा येथील टेबल टेनिस एरेना येथे यशस्वीरीत्या पार पडली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील उदयोन्मुख तसेच अनुभवी खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले.
आर्यमान डेकाटे आणि रावी पाटणी या दोघांनीही आपापल्या गटांत प्रत्येकी तीन विजेतेपदे पटकावत ट्रिपल क्राऊन मिळविला. आर्यमान याने मुलांच्या १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि पुरुष एकेरी या तीन गटांत विजेतेपद मिळविले. त्याच्या
Jesh
vel
Sinc
या यशातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याने आर्चिस अथवले याचा केलेला पराभव. रावी पाटणी हिनेही तितकीच प्रभावी कामगिरी करत मुलींच्या गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरी या तिन्ही गटांत विजेतेपद पटकाविले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटात
Rajpura
roga
+
अध्यान डेकाटे याने, तर मुलींच्या १३ वर्षांखालील गटात आयुषी ताश्निवाल हिने विजेतेपद मिळविले. मुलींच्या ११ वर्षांखालील गटात प्रिया दोरोई हिने अजिंक्यपद पटकाविले, तर मुलांच्या १९ वर्षांखालील गटात आर्चिस अथवले याने विजेतेपद मिळविले. पुरुष दुहेरीचे विजेतेपद गणेश कुलकर्णी आणि संजीव गायकवाड यांनी पटकाविले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions